कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 राज्यातील 44 विद्यार्थ्यांना बालदिनी ‘बालचित्रकार पुरस्कार’ जाहीर..

🟥 नेमळेची ऋतिका भास्कर राऊळ ही या पुरस्काराची ठरली मानकरी..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्ग,दि.१७:- शिक्षक ध्येय आणि आगरकर विद्या भवन, हिंगणघाट, जिल्हा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२३’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर आयोजन करण्यात आले होते. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती.

अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी)

ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)

क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)

विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या कला असतात, त्यातील एक कला म्हणजे ‘चित्रकला’ होय. सुंदर, सुबक चित्र काढणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या कलेला उत्तेजन देणे, त्यांची सुप्त कला राज्यातील इतर विद्यार्थ्यांसमोर आणणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील कलाकार वृत्ती वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.

अ, ब आणि क गटातील एकूण 44 उत्कृष्ठ बाल चित्रकारांना दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांमध्ये सन्मानचिन्ह (ट्रॉफी) आणि प्रिंट प्रशस्तीपत्र (सर्टिफिकेट) + शिक्षक ध्येयचे प्रिंट मासिके यांचा समावेश आहे.

यामध्ये क गटात नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळेची ऋतिका भास्कर राऊळ ही या पुरस्काराची मानकरी ठरली आहे. त्याबद्दल नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आत्माराम भि. राऊळ मुख्याध्यापक कल्पना बोवलेकर शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

या स्पर्धेसाठी श्री. देविदास शिवराम हिरे, कला शिक्षक, ‘शिक्षण मंडळ भगूर’ संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड, जि. नाशिक आणि श्री. अमित सुभाष भोरकडे, जि. प. शाळा, सोड्डी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!