ताठाखालच्यांच्या तोंडी हिंमतीने शब्द शोभत नाहीत; मिलिंद बोभाटे
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.१४: सांगवे सोसायटीमध्ये रेशन धान्याचा काळाबाजार होत होता. हे गावातील प्रत्येकाला माहीत आहे. गोरगरिबांच्या धान्याचा काळाबाजार रोखण्याला जर सुरेश सावंत गुंडगिरी म्हणत असतील, तर हो जनतेच्या हितासाठी अशी गुंडगिरी याही पुढे सुरूच राहणार आहे. त्यामुळे अगोदर सुरेश सावंत यांनी सांगवे सोसायटी मध्ये निवडून येऊन दाखवावे आणि नंतरच सिंधुदुर्ग बँक निवडणूकीच्या वल्गना कराव्यात.
तूमचे कर्तृत्व सांगवेवासीयांना चागलेच माहीत आहे. काल परवा प्रयत्न पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांचा द्वेष करणारे सुरेश सावंत आता त्यांच्याच ताठाखाली आहेत. जर एवढीच हिंमत होती, तर धान्याचा टेम्पो अडवला तिथे यायचे होते. मग गुंडगिरी कशी असते, ते समजले असते. मागील निवडणुकीत पंचायत समितीची उमेदवारी मिळत नव्हती, तेव्हा हेच सुरेश सावंत नेत्यांना लाखोली वाहत होते. सतीश सावंत यांच्यामुळेच आपल्याला उमेदवारी मिळाली असे हेच सुरेश सावंत सांगत होते.
चिरे, वाळूची वाहतूक करताना रॉयल्टी न भरता शासनाची फसवणूक करणाऱ्या सुरेश सावंत यांना सांगवे सोसायटीतील धान्याचा काळाबाजार दिसणारच नाही. ते धान्य सोसायटीचे नव्हते, तर कोणाचे होते, हे सुरेश सावंत यांनी सांगावे. लवकरच सत्य बाहेर येईल, आमचा न्यायदेवते बरोबरच सांगवे गावच्या ग्रामदेवतेवर विश्वास आहे. त्यामुळे गोरगरिबांना लुटणाऱ्याना, त्रास देणाऱ्यांना ग्रामदेवता शासन करणार हे निश्चित आहे आणि तो दिवस दूर नाही, तुमचे घडे आता भरले आहेत. नेहमी दुसऱ्याचा द्वेष करणाऱ्या सुरेश सावंत यांना सतीश सावंत यांचा उत्कर्ष पहावत नाही. म्हणूनच ते आता एकेरीवर आले आहेत. हे म्हणजे ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ असे गांधीनगर खलांतर माजी ग्रामपंचायत सदस्य मिलिंद बोभाटे यांनी म्हटले आहे.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

