पोस्ट कर्मचाऱ्याला मारहाणप्रकरणी अटकपूर्व जामीन
पोस्ट कर्मचाऱ्याला मारहाणप्रकरणी अटकपूर्व जामीन
कणकवली
पोस्ट खात्यातील सहाय्यक शाखा डाकपाल याला शिवीगाळ करून मारहाण व शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी फोंडाघाट येथील मिथिल अशोक सावंत याला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. ‘संशयिताच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले. १२ ऑगस्ट रोजी फोंडाघाट नाथ पैनगर येथील रवींद्र अनंत सावंत यांच्या नावे आलेली मनिऑर्डर देण्याच्या कर्तव्यावर असताना फिर्यादी दीपक पाटील यांनी रवींद्र सावंत यांची सही घेऊन रक्कम ताब्यात दिली. दरम्यान, ती मनिऑर्डर वादग्रस्त भाडेकरु यांनी पाठविली असल्याचे रवींद्र सावंत यांना समजून आल्याने त्यांनी मनिऑर्डर नाकारून त्याचे पैसे फिर्यादीला परत केले. त्यावेळी आरोपीने फिर्यादीच्या हातातून मनिऑर्डरचा फॉर्म काढून घेऊन केलेल्या सह्यांवर खाडाखोड केली. त्याबाबत फिर्यादीने विचारणा करता त्याला शिवीगाळ करून धमकी देत मारहाण केली. याबाबत आरोपीविरुद्ध भा.दं.वि. कलम ३५३, ३३२, ५०४ नुसार गुन्हा दाखल झाला होता.

