जिल्हास्तर परसबाग स्पर्धेत आंबडपाल शाळा प्रथम
जिल्हास्तर परसबाग स्पर्धेत आंबडपाल शाळा प्रथम
तिवरे द्वितीय, तर मातोंड शाळा तृतीय
कणकवली
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय परसबाग स्पर्धेत कुडाळ तालुक्यातील जि. प. पू. प्राथमिक शाळा आंबडपालने – प्रथम तर कणकवली तालुक्यातील जि. प. शाळा तिवरे खालचीवाडी शाळेने द्वितीय क्रमांक मिळविला.
या स्पर्धेत वेंगुर्ले तालुक्यातील जि. प. शाळा मातोंड मिरिस्ते या शाळेने तृतीय तर जि. प. शाळा सर्जेकोट मिर्याबांद, जि. प. शाळा इन्सुली नं.
६ व जि. प. शाळा नाधवडे ब्राह्मणदेव नवलादेवीवाडी या शाळेला प्रोत्साहनर नंबर देण्यात आला आहे. परसबाग स्पर्धेसाठी सर्व तालुक्यातील शाळांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदविला होता. जिल्हास्तरीय समितीने प्रत्येक तालुक्यातील प्रथम क्रमांकाच्या शाळांना भेटी देऊन त्याचे मूल्यांकन केले होते. त्यानुसार जिल्हास्तरीय निकाल जाहीर करण्यात आला असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांनी म्हटले आहे.
