सावंतवाडी कंझ्युमर्सवर भाजपचे वर्चस्व
सावंतवाडी कंझ्युमर्सवर भाजपचे वर्चस्व
सावंतवाडी
सावंतवाडी कंझ्युमर्स सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत १५ जागांसाठी फक्त १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली आहे. या सोसायटीवर भाजपने आपले वर्चस्व कायम राखले आहे. विद्यमान चेअरमन प्रमोद गावडे, संजू ऊर्फ चंद्रकांत शिरोडकर, उमाकांत वारंग, हेमंत मराठे, जिल्हा बँकेचे चेअरमन मनिष दळवी, एकनाथ नाडकर्णी, लक्ष्मीकांत पणदूरकर, अजित मनोहर देसाई, रामू सरोज पाटील, व्हाईस चेअरमन सदानंद गंगाराम चव्हाण, कमला मेनन, धनश्री हेमंत मराठे अशा बारा उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.
सोसायटीवर मळेवाड येथील तीन संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे. कुडाळ, मालवण, कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघातील अर्ज प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे तीन जागा रिक्त राहिल्या आहेत. जिल्हा बँकेचे चेअरमन मनिष दळवी यांची कंझ्युमर्स सोसायटीच्या संचालकपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. विद्यमान चेअरमन प्रमोद गावडे, व्हाईस चेअरमन सदानंद चव्हाण, माजी चेअरमन उमाकांत वारंग, कमला मेनन आदी १२ पैकी निम्म्याहून अधिक विद्यमान संचालक आहेत. तिघांची नव्याने वर्णी लागली असून त्यात हेमंत मराठे, धनश्री मराठे आणि संजू शिरोडकर यांचा समावेश आहे
