दुर्गम सरमळे शीतपवाडी अखेर प्रकाशमय
दुर्गम सरमळे शीतपवाडी अखेर प्रकाशमय
नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून वीजपुरवठा तीन दिवस वीज होती गायब
ओटवणे
सरमळे गावात अतिदुर्गमस्थानी असलेल्या धनगरवासीयांच्या शीतपवाडीत गेल्या तीन दिवसांपासून वीज गायब असल्याची वीज वितरण कंपनीने तात्काळ दखल घेत शुक्रवारी सायंकाळी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून या वाडीचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू केला त्यामुळे शीतपवाडीवासीयांमधून समाधान व्यक्त होत असून वीज ग्राहक संघटनेसह सरमळे ग्रामपंचायत, वीज वितरण कंपनी आणि तरुण भारत संवाद चे आभार मानले आहेत. या वाडीतील धनगर बांधवांना रात्री अक्षरशः काळोखात काढाव्या लागल्या बीज अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत टोलवाटोलवी सुरू असल्याने याबाबत सरमळे माजी उपसरपंच समीर माधव यांनी सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय लाड यांचे लक्ष वेधले. तसेच नवीन टान्सफॉर्मर न बसविल्यास सावंतवाडी येथील वीज कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता त्यानंतर संजय लाड, सरमळे सरपंच विजय गावडे यांनी माजी आमदार राजन तेली यांच्यामार्फत वीज कंपनीला निर्वाणीचा इशारा दिला होता याची वीज कंपनीच्या बांदा व सावंतवाडी येथील अधिकारी वर्गाने तात्काळ शीतपवाडीत तात्काळ ट्रान्सफॉ र्मर बसविण्याच्या हालचाली सुरू केल्या. शुक्रवारी सायंकाळी या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसविल्यानंतर या वाडीचा वीजपुरवठा सुरळीत झाला.

