आपत्कालीनकोकणदेवगडमहाराष्ट्र

मुंबईहून गावी आलेल्या प्रौढाची आत्महत्या

मुंबईहून गावी आलेल्या प्रौढाची आत्महत्या

देवगड

पडवणे येथील सुनील जगन्नाथ जाधव (५५) यांचा मृतदेह तेथील ‘धारेचे काटे’ येथील मांगरानजीक वडाच्या झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. ही घटना शुक्रवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील जाधव हे अविवाहीत असून त्यांचे वास्तव्य कायम मुंबईला होते. दोन दिवसांपूर्वीच ते मुंबईहून पडवणे येथे आले होते. गुरुवारी सायंकाळी त्यांनी त्यांच्या वहिनीला आपण मुंबईला जात असल्याचे सांगितले व ते घरातून निघून गेले. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास गावात दूध विक्री करणाऱ्या एका महिला व्यावसायिकेस तेथील ‘धारेचे काटे’ येथील मांगरानजीक वडाच्या झाडाला सुनील जाधव यांचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत निदर्शनास आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर देवगड पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम, हवालदार व्ही. -एस. बिर्जे, कॉन्स्टेबल आचरेकर यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. घटनेची खबर दीपक गुरुनाथ जाधव यांनी देवगड पोलिसांत दिली. घटनेचा तपास हवालदार आशिष कदम करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!