ओटवणे-शीतपवाडी तीन दिवसांपासून अंधारात
*🟥ओटवणे-शीतपवाडी तीन दिवसांपासून अंधारात*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 ओटवणे, दि.१०:* सरमळे गावात अतिदुर्गमस्थानी असलेल्या शीतपवाडीत गेल्या तीन दिवसांपासून वीज गायब असून या वाडीतील धनगर बांधवांना रात्री काळोखात काढाव्या लागत आहेत. याबाबत बांदा तसेच माडखोल येथील वीज अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत टोलवाटोलवी सुरू असल्याने वीज कंपनीच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. सरमळे गावातील दुर्लक्षित शीतपवाडी डोंगरमाथ्यावर आहे. डोंगरमाथ्यावरील धनगर समाजाच्या या वाडीत मुळातच समस्यांचा डोंगर आहे. या वाडीला माडखोल वीज विभागामार्फत केसरी गावातून वीजपुरवठा होतो. तर ही वाडी सरमळे गावात येत असून वीज कंपनीच्या बांदा विभागातून सेवा दिली जाते. घनदाट जंगलाने वेढलेल्या शीतपवाडीत अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो. अशा वेळी या धनगर बांधवांनी माडखोल विभागाकडे तक्रार केली असता सरमळे गावातील ही वाडी बांदा विभागात असल्याचे सांगून जबाबदारी टाळली जाते. तर बांदा विभागाकडे गेले असता या वाडीला माडखोल विभागातून वीजपुरवठा होत असल्याने हे त्या विभागाचे काम असल्याचे सांगून मोकळे होतात.
अशावेळी वाडीला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कोणी वालीच नसल्याने याचा फटका शीतपवाडीला बसतो. या धनगर बांधवांना गेल्या तीन रात्री अंधारात काढाव्या लागल्या आहेत. त्यामुळे संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेऊन या वाडीच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावावा, अशी शीतपवाडीवासीयांची मागणी आहे. दरम्यान, याबाबत सरमळे माजी उपसरपंच समीर माधव यांनीही संबंधित अधिकारी वर्गासह कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले असता वीजपुरवठा शुक्रवारी सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्या दृष्टीने अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे गुरुवारची रात्रही शीतपवाडीवासीयांना काळोखातच काढावी लागणार आहे. याबाबत माधव यांनी सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय लाड यांचे लक्ष वेधले असून कार्यवाही न झाल्यास सावंतवाडी येथील वीज कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा माधव यांनी दिला आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
