करियरकुडाळराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

स्वछभारत नंतर ओडीफ प्लस चे सिंधुदुर्ग ला वेध; मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर

▪️ कागदोपत्री विकासावर आपली पाठ थोपटून घेण्यात कुडाळ पंचायत समितीचा भर..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.१४: प्रशासनात कागदी घोडे नाचविण्यात माहीर असणाऱ्या गटविकास अधिकारी कुडाळ यांनी ओडीएफ प्लस चे सर्वेक्षणचे गावातील संगणक परिचारक (डाटा ऑपरेटर) यांच्या माथी मारून मानधन नसल्याने आधीच हैराण असणाऱ्या संगणक परिचारकांनी या कामाला विरोध दर्शविला आहे.

ग्रामपंचायत मार्फत पूर्ण वर्षभराचे आगाऊ पैसे घेऊन शासनाने एका खाजगी कंपनीला डाटा ऑपरेटर भरतीचे ठेके महाराष्ट्रभर दिले. त्यानुसार ग्रामपंचायतींनी  रूपये १२०००/- महिना, त्यातले डाटा ऑपरेटर यांना मात्र ६००० रूपयेच मासिक पगारावरचे पैसे का? व कोणाच्या घशात? हा संशोधनाचा विषय आहेच. परंतु या गावातील डाटा ऑपरेटर मुलांना तो तुटपुंजा पगारही कोरोना काळात जीवाची पर्वा न करता काम करूनही अजून पर्यंत धड मिळालेला सुद्धा नाही. तरीही त्यांच्या माथी प्रशासनाचा धाक दाखवून हे अधिकारी अशा आडमुठ्या पद्धतीने काम करावयास लावत असतील तर मनसे याप्रश्नी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन या आमच्या गावातील युवक-युवतींच्या समस्या मांडणार आहोत. तरी सरपंच संघटनेने सुद्धा आपल्या गावचा पैसा अशाप्रकारे फुकट जात असेल तर त्याबाबत येणाऱ्या ग्रामसभेमध्ये मांडून त्याला विरोध करणे गरजेचे आहे.

त्याचप्रमाणे आमच्या गटविकास अधिकारी यांनी आपल्या पंचायत समिती मार्फत एका दिवसात हजारच्या वर बंधारे बांधले असे कागदोपत्री जाहीर केले. त्याचीही माहिती घेऊन महाराष्ट्र सैनिक प्रत्यक्षात बिडिओ यांना सोबत घेऊन जाग्यावर जाऊन पाहणी करण्याचेही काम करणार आहेत.

तसेच यापुढील काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच निधीला मोठ्या प्रमाणात शासनाकडून कात्री लावल्यामुळे जो काही तुटपुंजा निधी सिंधुदुर्गच्या विकासाला येईल त्याचा योग्य विनियोग होऊन सामान्य जनतेला जास्तीत जास्त फायदा कसा होईल यावरही महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग आगामी काळात लक्ष ठेवेल. असे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी म्हटले आहे.

*_💥बायपास टाळा ॲन्जिओप्लास्टी टाळा!!हदयविकार टाळा!!!💥_*

     *🔥शनिकृपा हार्टकेअर सेंटर🔥*

*शुक्रवार दि. १८ डिसेंबर २०२० सकाळी १० ते दुपारी १ चिपळूण.. व दुपारी ३ ते सायं. ६ रत्नागिरी..* (नावनोंदणी अवश्य)

💫डॉ.जयवंत खबाले हदयाची कार्टोग्राफी करतील व आर्टेरियल क्लिअरन्स थेरपीने उपचार करतील..

💫गेली २० वर्षात हजारो हदयविकार रूग्णावर विनाशस्रक्रिया यशस्वी उपचार..

🔹प्रविण मलुष्ठे बंगल्यासमोर, साळवी स्टॅाप, नाचणे, रत्नागिरी.
🔹दिपक लॅाजच्या पाठीमागे, भोगाळे, चिपळूण.

*🔮फोन:*
*_📱9689008081_*
*_📱9960316318_*
*_📱9960316318_*

🌈मंगळवार, बुधवार, गुरूवार तिन दिवस..

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!