कणकवलीकोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🟥 वारगाव येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने केली धडक कारवाई..

🟥 या कारवाईत सुमारे ५८ लाखाच्या दारूसह ६९ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त ; आरोपी चालकांला पळ काढण्यात आले यश

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कणकवली,दि-०९:-  कणकवली तालुक्यातील वारगाव येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने चोरट्या दारू वाहतुकीवर पुन्हा धडक कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे ५८ लाखाच्या दारूसह ६९ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वारगाव येथे बुधवारी मध्यरात्री एक वाजता ही कारवाई करण्यात आली. गोव्याहून मुंबईकडे बिनधास्तपणे ही चोरट्या दारूची वाहतूक केली जात होती. आरोपी चालकांला पळ काढण्यात यश आले आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
गोव्यातून राज्यात येणाऱ्या दारू वाहतुकीवर नियंत्रण येण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सातत्याने दारू वाहतुकीवर छापे टाकून प्रतिबंध आणण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली जात आहे. त्याच पद्धतीने वारगाव येथे पोलिस उपनिरीक्षक आर. बी. शेळके, हवालदार राजू जामसंडेकर यांना दारूची चोरटी वाहतूक एका ट्रक मधून होत असल्याची माहिती मिळाली. त्या दोघांनी वारगाव येथे आपल्या सहकाऱ्यांसह सापळा रचला आणि ६९ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र घाग, उपनिरीक्षक आर. बी. शेळके, सहायक उपनिरीक्षक गुरु कोयंडे, हवालदार राजू जामसंडेकर, प्रकाश कदम, प्रमोद काळसेकर, आशिष जामदार, बसत्याव डिसोजा, आरमारकर, बाळू पालकर, नार्वेकर यांच्या पथकाने ही केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!