मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्राबाबत आवाहन
मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्राबाबत आवाहन
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील मराठा समाजातील पात्र माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांनी त्यांच्या जवळ असलेल्या मराठा- कुणबी, कुणबी-मराठा या जातीचा कागदोपत्री पुरावा, सैन्यसेवा पुस्तक, ओळखपत्र आदी कागदपत्रे तात्काळ जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष भेट देऊन सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाकडून मराठा समाजातील पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याकरिता माहिती संकलित करण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. त्या अनुषंगाने मराठा समाजातील पात्र माजी सैनिक, पत्नी यांची माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालय, यांच्याकडून प्राप्त झाले आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क ०२३६२-२२८८२०
