Saturday, September 26, 2026
Latest:
कणकवलीकोकणमहाराष्ट्र

फोंडा चेकपोस्टवर गुरांची विनापरवाना वाहतूक रोखली

फोंडा चेकपोस्टवर गुरांची विनापरवाना वाहतूक रोखली

कणकवली

वाघेरी ते कोल्हापूरअशी दोन वाहनांमधून गुरांची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या नीलेश दौलत चव्हाण (३८, रा. वाघेरी) व स्वप्नील विजय हुले (२८, रा. हरकुळ खुर्द) यांना फोंडाघाट चेक पोस्टवर ताब्यात घेत वाहने व सहा गुरे जप्त केली. ही कारवाई बुधवारी सकाळी ११ वा. केली. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नीलेश चव्हाण हे टाटा कंपनीच्या बोलेरो गाडीत तीन बैलांना तर स्वप्नील हुले हे टाटा एस या गाडीत तीन पाडके दाटीवाटी व चाऱ्यापाण्याची सोय न करता वाघेरीहून कोल्हापूरच्या दिशेने जात होते. याची खबर ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. सदर वाहने चेक पोस्टवर तपासणी केली असता गाड्यांमध्ये दाटीवाटीने तीन बैल व तीन पाडके अशी सहा गुरे आढळून आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!