आपत्कालीनकोकणदेवगडमहाराष्ट्र

तळेबाजार येथील तरुणाचा तळ्यात बुडून मृत्यू

तळेबाजार येथील तरुणाचा तळ्यात बुडून मृत्यू

देवगड

तळेबाजार येथील तळ्यामध्ये बुधवारी सायंकाळी ४.३० वा. च्या सुमारास सखाराम वाघू झोरे (४५, रा. बापर्डे-सडेवाडी) या तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. याबाबत देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेबाजार येथील तळ्यामध्ये बुधवारी सायंकाळी तेथील रुमडे नावाच्या व्यक्तींना पाण्यात मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यांनी याबाबत तळेबाजार पोलीस पाटील मुकेश पारकर यांना माहिती दिली. पोलीस पाटील यांनी देवगड पोलिसांना कळविल्यानंतर देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन जाधव, महेंद्र महाडीक, अमित हळदणकर घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह तळ्याच्या पाण्यातून ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढला. तळेबाजार येथील प्रा. झोरे यांनी मृतदेहाची ओळख पटविली. मयत सखाराम झोरे हा बापर्डे सडेवाडी. येथे आईवडिलांसोबत राहत होता. त्याला तीन मुले असून एक मुलगा व मुलगी मुंबईला असतात. तसेच एक मुलगा शिरगाव हायस्कूल येथे शिकत असून तो हॉस्टेलमध्ये राहतो. सखाराम झोरे याला दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, सायंकाळी उशीरा देवगड ग्रामीण रुग्णालयात मृतदेह विच्छेदनासाठी आणण्यात आला होता. अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल जाधव करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!