कोकणमहाराष्ट्रवेंगुर्ले

आडेलीत तांदळाच्या पोत्यात आढळले चायनीजसदृश पदार्थ

आडेलीत तांदळाच्या पोत्यात आढळले चायनीजसदृश पदार्थ

रास्त दराच्या धान्य दुकानातील प्रकार

वेंगुर्ले

शासनातर्फे गोरगरीब जनतेला रास्त दराच्या धान्य दुकानांतून मोफत धान्य पुरविण्यात येते. बुधवारी सायंकाळी आडेली येथील धान्य दुकानात धान्य वितरणावेळी तांदळाच्या पोत्यामध्ये चायनीजसदृश्य पदार्थ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, याबाबत शासन स्तरावरून त्वरित चौकशी होऊन संबंधित धान्य पुरवठादारावर कारवाई व्हावी, अशी मागणी आडेली सोसायटीचे चेअरमन प्रकाश गडेकर यांनी केली आहे. बुधवारी सायंकाळी ५ वा. आडेली येथील रास्त दराच्या धान्य दुकानावर धान्य वितरण सुरू असताना तांदळाच्या पोत्यामध्ये प्लास्टिक पिशवीत चायनीजसदृश्य पदार्थ असल्याचे मापारी व सेल्समन यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित सचिव मोरेश्वर कांबळी व सोसायटी चेअरमन प्रकाश गडेकर यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर प्रकाश गडेकर यांनी वेंगुर्ले पुरवठा
विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यावर सायंकाळी उशिरा पुढील कार्यवाही सुरू होती. या तांदळाच्या पोत्यामध्ये कीडे व अळ्या सापडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थातून नाराजी व्यक्त करण्यात आली. या प्रकारची शासन स्तरावरून त्वरित चौकशी करण्यात यावी व दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी प्रकाश गडेकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!