अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी जामीन
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी जामीन
ओरोस
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या कुणाल संतोष गुरव (१९, रा. जांभवडे – वैभववाडी) याला विशेष न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी सशर्त जामिनावर मुक्त केले. संशयित आरोपीच्यावतीने अॅड. राजीव परुळेकर आणि अॅड. अश्पाक शेख यांनी काम पाहिले.
अल्पवयीन पीडित मुलगी ही विरोध करत असतानाही संशयित कुणाल गुरव याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार वैभववाडी पोलिसांत दाखल झाली होती. त्यानुसार पोलिसांनी १५ ऑक्टोबरला गुन्हा दाखल करून अटक केली होती.

