कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडी

फाईन आर्ट कॉलेजमध्ये आकाश कंदील स्पर्धा

फाईन आर्ट कॉलेजमध्ये आकाश कंदील स्पर्धा

सावंतवाडी

येथील बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट या कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आकाश कंदील प्रदर्शनाचे उद्घाटन युवराज्ञी श्रद्धा लखम सावंत-भोसले यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. सदरचे प्रदर्शन ७ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. या महाविद्यालयाच्यावतीने दरवर्षी विद्यार्थी पर्यावरणपूरक व कलात्मक अशा विविध प्रकारचे आकाशकंदील बनवितात. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्याआकाश कंदीलचे प्रदर्शन खुले ठेवले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी संस्था अध्यक्ष रमेश भाट, संस्था सदस्य केदार बांदेकर, अॅड. सौ. अनुराधा परब, नकुल पार्सेकर आदी उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी युवराज्ञी श्रद्धा लखम सावंत-भोसले म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आकाश कंदील पाहून यांच्या कलाकृतींचे कौतुक केले. तसेच भविष्यात महाविद्यालयाच्या विविध उपक्रमास सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. प्रास्ताविक जागृती गवळी हिने तर आभार प्राचार्य प्रकाश पेठे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!