कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

कलमठ चौकात रात्रीच्यावेळी समाजकंटकांकडून त्रास!

कलमठ चौकात रात्रीच्यावेळी समाजकंटकांकडून त्रास!

कणकवली कलमठ-बाजारपेठ येथील माणिक चौकानजीक असलेल्या पिंपळपारावर अनोळखी व्यक्ती जमाव करून रात्री त्या ठिकाणी बसून मोठमोठ्या आवाजात आरडाओरड, दंगा करतात. त्याचा त्रास आजुबाजूच्या नागरिकांना होत आहे. त्यामुळे त्यांना त्याठिकाणी बसण्यापासून पोलिसांनी मज्जाव, अशी मागणी पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्याकडे कलमठ ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले की, या

जमावाकडून अनपेक्षितरित्या गुन्हाही घडण्याची शक्यता आहे. तरी पोलिसांनी त्यांना त्याठिकाणी बसण्यास मज्जाव करावा.

निवेदन देतवेळी ग्रा. पं. सदस्य धीरज मेस्त्री, अनुप वारंग, सचिन खोचरे, अण्णा मठकर, शरद कुडतरकर, साक्षी कोरगावकर, अक्षय कोरगावकर, सचिन पेडणेकर, नितीन पेडणेकर, स्वरा गावडे, दिनेश लाड, शुभ्रा घाडीगावकर, तनोज कळसुलकर, राजेंद्र काकडे, मयूर काळगे, अशोक लाड, सायली केरकर, सोनाली मेस्त्री उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!