पोलीस पाटील पदांच्या भरतीला मंजुरी

पोलीस पाटील पदांच्या भरतीला मंजुरी

कुडाळ-६६, तर मालवण-८९ : उद्या कुडाळ येथे आरक्षण सोडत

कुडाळ

कुडाळ महसूल उपविभागातील कुडाळ व मालवण तालुक्यातील रिक्त असलेल्या एकूण १५५ पोलीस पाटील पदांच्या भरतीला मंजुरी मिळाली आहे. कुडाळ तालुक्यातील ६६, तर मालवण तालुक्यातील ८९ पोलीस पाटील पदांची आरक्षण सोडत ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे काढण्यात येणार आहे.
कुडाळ महसूल उपविभागीय अंतर्गत महसूल गावनिहाय पोलीस पाटील पदाची भरती करण्यात येणारी गावे पुढीलप्रमाणे आहेत. कुडाळ तालुका : मडगाव, कांडरगाव, गोंधळपूर, गुढीपूर, टेंबधुरीनगर, देऊळवाडी, पिंगुळी, रुमडगाव, कारियणे, टेंबगाव, पांग्रड, निरुखे, भरणी, सोनवडे तर्फ कळसुली, घाडीगाव, दुर्गानगर, साईगाव, माणकादेवी, कविलगाव, कुटगाव, बेलनदी, बोरभाट, मिटक्याचीवाडी, तळेगाव, आंदुर्ले, मुणगी, हुमरमळा, गांधीनगर, गोवेरी, गोंधयाळे, वालावल, गावधड, मुड्याचा कोंड, हुमरस, जांभरमळा, घाटकरनगर, तळीगाव, बेनगाव. कट्टागाव, ढोलकरगाव, नमसगाव, भट्टगाव, खोचरेवाडी, नमसपूर, खुटवळवाडी, साकिर्डे, कुपवडे, गवळगाव, भूतवड, झाराप, केरवडे तर्फ माणगाव, कांदुळी, बाव, चाफेली, मोरे, नेरुर कर्याद नारुर, गोठोस, कुसबे, साळगाव, बांबुळी, गांधीग्राम, नाईकनगर, सांगिर्डे, कविलकाटे, नेहरुनगर अशा ६६ गावांचा, तर मालवण तालुका : आमडोस, कुणकवळे, खोटले, गुरामवाड, गोळवण, चौके, तळगाव, तोंडवली, धामापूर, नांदरूख, पेंडूर, पोईप, बिळवस, महान, मालोंड, वराड, वायंगवडे, सुकळवाड, हडी, आडवली, पळसंब, बांदिवडे खुर्द, भगवंतगड, राठिवडे, शिरखंडे, वायरी, तारकर्ली, कातवड, काळेथर, मळा, वाक, वाघवणे, आनंदव्हाळ,
कर्लाचाव्हाळ, माळकेवाडी,
परबवाडा, बागवाडी, खरारे, मोगरणे,
सोनारवाडी, कुसरवे, चाफेखोल,
नागझर, टेंबवाडी, डिकवल, खांद पेडवे, म्हावळुंगे, गवळीवाडा, भटवाडी, घाडीवाडी, गावठाण, वरचीवाडी, डोंगरेवाडी, अपराजवाडी, कुंभारवाडी, भटवाडी (चिंदर), पालकरवाडी, गावठाणवाडी, सडेवाडी, तेरईवाडी, जामडूल, पिरावाडी, हिर्लेवाडी, कावा, मर्डे, सय्यदजुवा, मार्गाचीतड, वाडीडांगमोडे, खाजनवाडी, मागवणे, मळावाडी, पालयेवाडी, बगाडवाडी, पलीकडीलवाडी, बागवेवाडी, बेलाचीवाडी, कोळंब, न्हिवे, ओझर, सर्जेकोट, शेमाडराणेवाडी, कोथेवाडा, गावकरवाडा, जुवापाणखोल आंगणेवाडी, भोगलेवाडी, आमवणे, खेरवंद अशा ८९ गावांचा समावेश आहे. दोन्ही तालुक्यातील एकूण १५५ पदांसाठी मंजूर बिंदूनामावलीप्रमाणे प्रचलित शासकीय तरतुदीनुसार संबंधित गावांच्या लोकसंख्येनुसार व चिठ्ठीद्वारे आरक्षण निश्चिती करायची आहे. उपस्थित राहवे, असे आवाहन कुडाळच्या उपविभागीय अधिकारी तथा पोलीस पाटील पदभरती प्रक्रिया समितीच्या अध्यक्षा ऐश्वर्या काळुशे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!