कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

आरटीओच्या वक्तव्यावरून वादाची शक्यता – पराडकर

*🟥आरटीओच्या वक्तव्यावरून वादाची शक्यता – पराडकर*

*🟥 रिक्षा चालक आज भेट घेऊन लक्ष वेधणार! : शासनाच्या २००७ च्या जीआर चे पालन करावे!*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.०६:* सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी रिक्षाचालक जिल्ह्यात कुठेही व्यवसाय करू शकतो, या वक्तव्यामुळे रिक्षाचालक-मालकांत नव्याने वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा रिक्षाचालक-मालक संघटनेचे शिष्टमंडळ सोमवार ६ नोव्हेंबरला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांची भेट घेणार आहे. अधिकाऱ्यांनी सदरचे वक्तव्य मागे घेऊन परिवहन विभागाच्या २०-११-२००७ च्या जीआरप्रमाणेच रिक्षा मालकांना देण्यात आलेल्या अटी- शर्तीनुसारच रिक्षा व्यवसाय करण्यास परवानगी देऊन निर्माण होणारे वाद टाळावेत, अशी मागणी करण्यात येणार आहेत. अन्यथा अधिकाऱ्यांना घेराव घालावा लागेल, असा इशारा दिला आहे, अशी माहिती संघटनेचे सचिव सुधीर पराडकर यांनी दिली. १६ ऑक्टोबर २०२३ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कार्यालयात सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षाचालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी बैठकीत सचिव सुधीर पराडकर यांनी शासनाच्या २००७ चा जीआर दाखवला. शासनाने २००७ च्या जीआरनुसार कोकण विभागात ऑटो रिक्षा स्टँडपासून ३२ कि. मी. च्या क्षेत्रामध्ये ऑटोरिक्षा परवानाधारकास व्यवसाय करता येतो. परंतु नजीकच्या स्टॅन्डच्या क्षेत्रामध्ये जाऊन स्थानिक धंदा करू नये, असे बंधनकारक आहे. असे असताना एका स्टॅन्डमधील रिक्षा दुसऱ्या स्टॅन्डच्या क्षेत्रात चालत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत
असल्यामुळे त्यावर उपाययोजना म्हणून सर्व प्रवासी ऑटोरिक्षावर मागच्या व दोन्ही बाजूस परमिट नंबर आणि स्टॅन्डचे नाव मोठ्या आकारात आणि लाल रंगात लिहावे. प्रत्येक रिक्षाधारकाने ३२ कि. मी. च्या आत परंतु दुसऱ्या स्टॅन्डच्या क्षेत्रात जाऊन रिक्षा घालून स्थानिक धंदा करू नये, अशा अटी घालून दिल्या आहेत. त्यामुळे या जीआरप्रमाणे जिल्ह्यात रिक्षा चालक-मालकांत कोणताही वाद न होता व्यवसाय सुरळीत सुरू आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांनी होणारे वाद टाळण्यासाठी शासनाच्या जीआरचे पालन करून केलेले वक्तव्य मागे घ्यावे व संघटनेला सहकार्य करावे, या मागणीसाठी संघटनेचे शिष्टमंडळ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी काळे यांची भेट घेणार असल्याचे पराडकर यांनी म्हटले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!