फळपीक विम्याची भरपाई जमा करा!

फळपीक विम्याची भरपाई जमा करा!

सावंतवाडी

माजी आमदार राजन तेली यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घेतली. शेतकरी फळपीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई अद्याप जमा नाही. तसेच संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान जमा झाले नाही. तसेच शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या आदी विषयांबाबत तेलींनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.यावर शेतकरी पीक विमा योजनेचे पैसे पुढील ८ दिवसात शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर जमा करायच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. संजय गांधी निराधार योजनेचे पैसे त्वरित देण्याच्या सूचना अधिकाऱ्याना दिल्या. शेतकरी सन्मान योजनेसंदर्भात कृषी अधिकारी राऊत यांना बोलवून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींवर चर्चा केली आणि लवकरात लवकर उपाय काढण्यास सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!