आरोंदा मराठा समाजाचे ८ रोजी लाक्षणिक उपोषण
आरोंदा मराठा समाजाचे ८ रोजी लाक्षणिक उपोषण
न्हावेली
मराठा बांधवाना आरक्षण मिळावे,
यासाठी जालना येथील मराठा समाज समन्वयक मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर आंदोलने होत आहेत. याचाच एक भाग म्हणून आरोंदा येथील मराठा बांधवांनी येत्या ८ नोव्हेंबरला एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण पुकारले आहे. याबाबत तहसीलदार श्रीधर पाटील यांना आरोंदा ग्रामस्थांनी निवेदन दिले. यावेळी मराठा समाज सावंतवाडी तालुकाध्यक्ष सीताराम गावडे, अभिमन्यू लोंढे, अध्यक्ष सखाराम जामदार, उपसरपंच सुभाष नाईक, ग्रामपंचायत सदस्य नरेश देऊलकर, शिल्पा नाईक, सुभद्रा नाईक, शुभांगी नाईक, विद्याधर नाईक, विष्णू नाईक, राजेश नाईक, शलाका नाईक, अंकिता मयेकर, संदेश परब, प्रशांत कोरगावकर, शांताराम परब, अनंत नाईक, कृष्णा आचरेकर, आनंदी नाईक, दिलीप नाईक, हनुमान नाईक, राजू नाईक आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सकाळी १० वाजता ग्रामपंचायत आरोंदा ते कस्टम ऑफिस, पोस्ट ऑफिस अशी रॅली काढण्यात येणार आहे.

