कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

थकबाकीदारांनी एकरकमी परतावा योजनेचा लाभ घ्यावा!

थकबाकीदारांनी एकरकमी परतावा योजनेचा लाभ घ्यावा!

सिंधुदुर्गनगरी

राज्य इतर मागासवर्गीय ‘ओबीसी’ महामंडळाच्या थकित कर्ज रक्कम असलेल्या लाभार्थ्यांनी एकरक्कमी परतावा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ मर्या. चे जिल्हा व्यवस्थापक प्रिती आर. पटेल यांनी केले आहे. इतर मागासवर्गीय (ओबीसी) वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांची उपकंपनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लि. यांच्यामार्फत विविध कर्ज योजनेतंर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर मागास ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराकरिता अल्प व्याजदराने कर्ज वितरित केले आहे. ‘ओबीसी’ महामंडळाच्या थकित कर्ज प्रकरणात संपूर्ण थकित कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणाऱ्यांसाठी थकित व्याज रक्कमेत ५० टक्के सवलतीची एकरकमी परतावा योजना राबविण्यात येत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!