आणखीसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

पैशाचे पाकीट मुळ मालकाला परत; दिगंबर नाईक यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.१३: पंधरा हजार रुपये आणि महत्त्वाचे कागदपत्र असलेले पाकीट रस्त्यावर सापडल्यावर आधार कार्ड वरील नंबर वरून संपर्क साधत कास येथील तुषार भाईप या मुळ मालकाला परत देण्याचा प्रामाणिकपणा सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील युवकाने केला. दिगंबर पांडुरंग नाईक असे त्या युवकाचे नाव आहे.

रविवारी सकाळी दिगंबर नाईक हे आपल्या कामानिमित्त बांदा येथे गेले होते. आपले काम आटोपल्यानंतर घरी परतत असताना बांदा कट्टा कॉर्नर येथील एका दुकानाजवळ रस्त्यावर पाकीट पडल्याचे त्यांना दिसून आले. लागलेच त्यांनी ते पाकीट उचलले त्यामध्ये पंधरा हजार रुपये रोख रक्कम तसेच विविध बँकांचे एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, लायसन्स आदी इतर महत्वाची कागदपत्रे होती. त्यांनी नजीकच्या दुकानदारांकडे याबाबत चौकशी करून खात्री केली. मात्र, आपले पाकिट नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी आत मध्ये असलेल्या आधार कार्ड च्या मागील नंबर वरून संपर्क साधला असतात कास येथील तुषार लक्ष्मण भाईप यांनी आपलेच पाकीट गहाळ झाल्याचे सांगितले. त्यांनतर दिगंबर नाईक यांनी खात्री व ओळख पटवून सदरचा पाकीत त्याच्या ताब्यात दिले.

भाईप हा युवक गोवा येथे खासगी कंपनीत नोकरीला असतो. आज तो बांदा येथे आला असता त्यांचे पाकीट गहाळ झाले होते. तो पालिकेची शोधाशोध करत असतांच दिगंबर याला सापडलेले पाकीट परत केल्याने त्याने खुप खुप आभार व्यक्त केले. शिवाय दिगंबर याच्या प्रामाणिकपणाबद्दलही येथील व्यापारी वर्गांनी कौतुक केले.

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!