मालवणातील ‘त्या’ बांधकामांचे फेरसर्वेक्षण होणार!
मालवणातील ‘त्या’ बांधकामांचे फेरसर्वेक्षण होणार!
नीलेश राणे यांची पालकमंत्री, प्रशासनासोबत चर्चा
मालवण
मातवण किनारपट्टीवरील दांडी, गवंडीवाडा, बाजारपेठ येथील काही बांधकामे अनधिकृत असून त्यावर कारवाई करण्याची कार्यवाही महसूल प्रशासनाने केली होती. या प्रश्नी स्थानिकांनी भाजपचे कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघ प्रमुख, माजी खासदार नीलेश राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले होते. दरम्यान, राणे यांनी पालकमंत्री चव्हाण यांच्यासह प्रशासनासोबतही चर्चा केली प्रशासनासोबत सकारात्मक चर्चेअंती सर्व बांधकामांचे फेरसर्वेक्षण करण्याचे महसूल प्रशासनाकडून निश्चित झाले आहे. अशी माहिती जिल्हा बँक संचालक बाबा परब यांनी दिली. नौसेना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ४ डिसेंबर रोजी मालवण दौऱ्यावर येत आहेत. प्रशासन नेहमीचे कामकाज तसेच नौसेना दिन नियोजनात असल्यामुळे बांधकामांचे फेरसर्वेक्षण ४ डिसेंबरनंतर होऊन सर्वेक्षण अहवालानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती प्राप्त झाल्याचे बाबा परब यांनी सांगितले. एकूणच प्रशासनस्तरावरील या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले आहे. किनारपट्टी भागातील काही बांधकामांना नोटीसा आल्यानंतर अनेकजण हवालदिल झाले होते. अनेक वर्षे असलेल्या आपल्या बांधकामांवर कारवाई होणार. श राणे असल्यामुळे ते चिंतेत होते. स्थानिकांनी राणे तसेच चव्हाण यांचे लक्ष वेधले होते. प्रशासन अनधिकृत ठरवत असेल, तर त्या जागेचा सर्व्हे करून प्रशासनाने खात्री करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली होती. या सर्व बाबींचा विचार करता, त्याला पालकमंत्री तसेच राणे यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवित प्रशासनस्तरावर माहिती घेऊन पुढील भूमिका घेतली जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार या बांधकामांचे फेरसर्वेक्षण होणार असल्याचे प्रशासनस्तरावर निश्चित झाले आहे, अशी माहिती परब यांनी दिली आहे.

