मतदानादिवशी आचरा आठवडा बाजार बंद
मतदानादिवशी आचरा आठवडा बाजार बंद
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक
निवडणूक, पोटनिवडणूक २०२३ करिता रविवार ५ नोव्हेंबर २०२३ रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आचरा गावातील आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिले आहेत. या दिवशी भरविण्यात येणारे आठवडा बाजार अन्य दिवशी भरविण्यास अनुमती देण्यात येत आहे.. राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक, पोटनिवडणूक २०२३. ही ३ ऑक्टोबरपासून जाहीर झाली. ५ नोव्हेंबरला ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. उपरोक्त दिवशी जिल्ह्यातील ज्या-ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येतो, त्या-त्या ठिकाणचा आठवडा बाजार मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदान सुरळीतपणे पार पाडावे, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने बंद ठेवणे आवश्यक आहे.

