दुचाकीच्या अपघातात दोन्ही चालक गंभीर जखमी
दुचाकीच्या अपघातात दोन्ही चालक गंभीर जखमी
झाराप बायपास येथील घटना: अन्य एक किरकोळ जखमी एकावर गुन्हा दाखल
कुडाळ
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर झाराप बायपास (झिरो पॉईंट) येथे पॅशन प्रो मोटारसायकलची ज्युपिटर दुचाकीला जोराची धडक बसून अपघात झाला. यात प्रवीण भालचंद्र मार्गी (३३, रा. हुमरमळा-वालावल) व बाबुराव धाकू बरागडे (४६, रा. झाराप) या दोन्ही दुचाकीस्वारांना गंभीर दुखापत झाली. तर सुमित दत्ताराम परब (३१, हुमरमळा-वालावल) यांना किरकोळ दुखापत झाली. जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. नंतर अधिक उपचारासाठी बांबोळी-गोवा येथील रुग्णालयात हलविण्यात आले. ही घटना गुरुवारी सायंकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास घडली..
