कणकवलीकोकणक्राइममहाराष्ट्र

सांगवे घरफोडीतील महिलांचा हुंबरटच्या चोरीतही सहभाग

सांगवे घरफोडीतील महिलांचा हुंबरटच्या चोरीतही सहभाग

कणकवली

सांगवे-संभाजीनगर येथील जयश्री
पुंडलिक सावंत यांचा बंद बंगला फोडून आतील ५४ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अंजली गणेश कुबडे (२९, हरकुळ बुद्रुक) व पूजा विश्वनाथ गावडे (२२, वागदे) यांची कसून चौकशी सुरू आहे. संशयितांचा हुंबरट येथील घरफोडीतील सहभाग सिद्ध झाला आहे. सांगवे व हुंबरट घरफोडीतील मिळून जवळपास ३० हजाराची भांडी जप्त करण्यात आली. दोन्ही महिलांना पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यावेळी हुंबरट घरफोडीप्रकरणी त्यांचा न्यायालयाकडे ताबा मागण्यात येणार असल्याची माहिती तपासी अंमलदार तथा पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!