कुडाळ येथे उद्या जिल्हा अंनिसची सभा
कुडाळ येथे उद्या जिल्हा अंनिसची सभा
मालवण
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग कार्यकारिणीची सभा अॅड. राजीव बिले यांच्या अध्यक्षतेखाली ५ रोजी दुपारी ३ वा. कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय येथे आयोजित केली आहे. सभेमध्ये जिल्हा कार्यकारिणीचा विस्तार करणे आणि जादूटोणाविरोधी कायद्याची प्रात्यक्षिकांसह कार्यशाळा आयोजित
करण्यासंबंधी नियोजन तसेच शाळा, विद्यालये, कॉलेज गावागावांमध्ये व शासनाचा जादूटोणाविरोधी कायदा समजून सांगण्यासाठी व्याख्याने आयोजित करण्याबाबतचे नियोजन केले जाणार आहे. उपस्थित राहवे, असे आवाहन जिल्हा संघटक विजय चौकेकर आणि जिल्हा सचिव अजित कानशिडे यांनी केले आहे.

