कुणी लाच मागितल्यास संपर्क साधा – अरुण पवार
कुणी लाच मागितल्यास संपर्क साधा – अरुण पवार
कुडाळ
कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्यासाठी कुणी खासगी व्यक्ती शासकीय कामासाठी शासकीय शुल्काव्यतिरिक्त पैशांची मागणी करीत असेल, तर कुडाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (सिंधुदुर्ग) कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन या विभागाचे पोलीस उपअधीक्षक अरुण पवार यांनी. दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त केले आहे. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (सिंधुदुर्ग) यांनी या सप्ताहाचे तालुकानिहाय आयोजन केले आहे. संपर्क : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (सिंधुदुर्ग) कार्यालय (कुडाळ तहसीलदार कार्यालयासमोर) टोल फ्री नंबर १०६४, दूरध्वनी ०२३६२ – २२२२८९, मोबा- ९८२१९१९९१५.

