अमली पदार्थ रॅकेटचे मुळापासून उच्चाटन करावे – संदीप मेस्त्री
*🟥अमली पदार्थ रॅकेटचे मुळापासून उच्चाटन करावे – संदीप मेस्त्री*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.०३:* गांजा व तत्सम अमली पदार्थांची पाळे मुळे आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचली आहेत. यात तरुण पिढी बरबाद होत आहे. पोलिसांनी नुकत्याच अशाप्रकारे गांजा विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई केली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. पण, पोलिसांनी या प्रकरणांमध्ये सखोल चौकशी करून त्याच्या मुळापर्यंत पोहोचून अमली पदार्थ खरेदी विक्रीचे मुळापासून उच्चाटन करावे, अशी मागणी कलमठ सरपंच तथा भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी केली आहे. मेस्त्री यांनी म्हटले आहे की, गेल्या काही कालावधीत जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये गांजा व तत्सम अमली पदार्थ खरेदी विक्री होत असल्याची माहिती पुढे येत आहे. यापूर्वीही पोलिसांनी अशाप्रकारे गांजा विक्री करणाऱ्या काही तरुणांवरकारवाई केलेली होती. गेल्या आठवड्यात कणकवली शहरांमध्येही अशाचप्रकारे दोघांवर कारवाई करण्यात आली. या अमली पदार्थांच्या खरेदी विक्रीमध्ये पोलिसांनी मुळापर्यंत जाण्याची गरज आहे. या अमली पदार्थांच्या खरेदी विक्रीसाठी असलेली साखळी पोलिसांनी शोधून काढून त्यांच्या म्होरक्यापर्यंत पोहोचल्यास याचा बिमोड करणे शक्य होणार आहे. गेल्या काही कालावधीत नवतरुण या अमली पदार्थांच्या आहारी जाताना दिसतात. या विळख्यात एकदा सापडल्यानंतर हे तरुण व त्यांचे कुटुंबीय मोठ्या अडचणीत येतात. येणाऱ्या पिढीला या अमली पदार्थापासून असलेला धोका टाळण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. त्यामुळे पोलिसांनी स्वतंत्र पथकामार्फत मुळापर्यंत जाऊन या रॅकेटचा पर्दाफाश करावा अशी मागणी मेस्त्री यांनी केली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
