गांजा विक्रीप्रकरणी आणखी एकाला अटक
गांजा विक्रीप्रकरणी आणखी एकाला अटक
कणकवली : गांजा विक्रीप्रकरणी स्थानिक गुन्हा
अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केलेल्या अल्ताफ जमिल अख्तर (२३, कलमठ – मुस्लीमवाडी) या संशयितास गुरुवारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान याप्रकरणी नीलेश ज्ञानदेव साटम (४४, जानवली) व चेतन रामू जाधव (२०, कलमठ-कुभांरवाडी) यांना एलसीबीच्या पथकाने यापूर्वीच अटक केली असून ते देखील सध्या पोलीस कोठडीत आहेत. सदरची कारवाई एलसीबीच्या पथकाने येथील हॉटेल अप्पर डेकनजीक गुरुवार २६ ऑक्टोबरला रात्री केली होती. ३८ हजार ८०० रुपये किमतीचा गांजासदृश पदार्थ जप्त करतानाच नीलेश व चैतन यांना अटक करण्यात आली होती

