कोकणमहाराष्ट्रवेंगुर्ले

फळपीक विम्यासाठी ६ रोजी आंदोलन

फळपीक विम्यासाठी ६ रोजी आंदोलन

वेंगुर्ले

५ नोव्हेंबर पुर्वी २०२२-२३ मधील फळपीक विमा नुकसान भरपाई न मिळाल्यास ६ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ले तालुका कृषी कार्यालयासमोर तीव्र उपोषण करण्यात येईल, असा इशारा वेंगुर्ले तालुक्यातील भात पीक व आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे वेंगुर्ले तालुका कृषी अधिकारी यांना दिला आहे. २०२३-२४ मधील पीक विमा भरण्याची तारीख जवळ आली तरी मागील पीक विमा नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही. यासंदर्भात
वारंवार अर्ज, विनंत्या आंदोलने, उपोषणे करूनही शासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आता शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. त्यामुळे ५ नोव्हेंबरपूर्वी २०२२-२३ ची फळपीक विमा नुकसान भरपाई शासनाकडून न मिळाल्यास वेंगुर्ले तालुका कृषी कार्यालयासमोर ६ नोव्हेंबर रोजी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्यावतीने श्यामसुंदर राय व प्रदीप शांताराम सावंत यांनी वेंगुर्ले तालुका कृषी अधिकारी यांची भेट घेऊन दिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!