कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्या पहिल्याच कोजागिरी कवी संमेलनाला अध्यक्ष व सचिवांची दांडी..

🟥 उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, जिल्हा कोषाध्यक्ष भरत गावडे,सचिव विठ्ठल कदम यांच्या उपस्थितीत कवी संमेलन झाले यशस्वी..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२९:- कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे प्रथम कोजागरी संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. आज सायंकाळी सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या सावंतवाडी शाखेच्या या कवी संमेलना दस्तर खुद्द सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष आणि सचिव यांनी मात्र सपशेल पाठ फिरवली. असे असतानाही कवी संमेलनाचे अध्यक्ष आणि सेवानिवृत्त राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व कवी वाय. पी. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सदर संमेलन मात्र उत्साहात पार पडले. सदर संमेलन यशस्वी करावे असा गाजावाजा करणारे आणि सदर संमेलन उत्साहात पार पाडावे असे आवाहन करणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आणि सचिवांनीच कवी संमेलनाकडे पाठ फिरवल्यामुळे उपस्थित कवींमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. कारण आपल्याच कविता आपणच वाचाव्यात, आपणच सादर कराव्यात आणि आपणच टाळ्या वाजव्यात हे कोणत्याही साहित्यिकाला किंवा कवीला कवीच्या मनाला न पटणारे कृत्य आहे. मात्र हे घडले सावंतवाडीत आणि त्याचे ऐतिहासिक साक्षीदार झाले ते कवी संमेलनात सहभागी झालेले दुर्दैवी कवी. मात्र कार्यक्रमास उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, जिल्हा कोषाध्यक्ष भरत गावडे, सचिव कवी विठ्ठल कदम,  प्रा. डॉ. गणेश मर्गज, प्रा. एन. डी. कार्वेकर, सेवानिवृत्त शिक्षक श्री. गोवेकर यांसह काही साहित्यप्रेमी उपस्थित होते.

 

या कवींनी भरले रंग –

 

सदर कवी संमेलनात कवी संमेलनाचे अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी उपस्थित कवींना मार्गदर्शन करीत स्वतः माती आणि नातीशी जोड असणारी कविता सादर केली. त्यानंतर उपस्थित असलेले कवी आणि कवयित्री यांनी कोजागरी संमेलनात रंगत आणली.  यात कवी वाय.पी नाईक, मालवणी कवी रामदास पारकर, सद्याचे आघाडीचे कवी दीपक पटेकर, विठ्ठल कदम, प्रज्ञा मांतोडकर, ऋतुजा सावंत – भोसले, किशोर वालावलकर, मनोहर परब, स्वप्ना गोवेकर, मंगल नाईक, प्रा.रुपेश पाटील, प्रा. श्वेतल परब, दत्ताराम सावंत, संतोष पवार, आशा मुळीक, सुहासिनी सडेकर यांनी दर्जेदार कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!