कृषिकोकणमहाराष्ट्रवेंगुर्ले

केंद्राने विमा हफ्ता न भरल्याने बागायतदारांची तीव्र नाराजी

केंद्राने विमा हफ्ता न भरल्याने बागायतदारांची तीव्र नाराजी

केंद्राने लवकरात लवकर विमा हफ्ता भरावा! : जिल्ह्यातील, शेतकऱ्यांची मागणी

वेंगुर्ले

केंद्र सरकारने विमा हफ्ता न भरल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. राज्याप्रमाणे केंद्र सरकारनेही लवकरात लवकर विमा हफ्ता भरावा व विमा कंपनीने तात्काळ विमा रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा आंबा-काजू बागायतदार संघाचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांनी केली आहे.

जिल्ह्यातील आंबा-काजू बागायतदारांनी रिलायन्स कंपनीकडे विमा हफ्ता भरल्याने त्यांच्याकडे सातत्याने मंजूर विमा रकमेची मागणी करीत असताना कंपनीने राज्य व केंद्र सरकारने विमा हफ्ता न भरल्याने मंजूर विमा रक्कम अद्यापपर्यंत न मिळाल्याने जिल्ह्यातील शेतकरी संतप्त तथा नाराज आहेत. संघटनेने शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी राज्याचा विमा हफ्ता भरल्याचे सांगून केंद्र सरकारशी संपर्क केल्याचे सांगितले. वास्तविक यावर्षी फक्त१७ टक्केच आंबा उत्पादन झाल्याने आंबा बागायतदार आर्थिकदृष्ट्या पूर्णत: कोलमडले असून कर्जबाजारी झाले आहेत.यवर्षी नुकसान भरपाईही अद्याप दिली गेली नाही. त्यातच विम्याची रक्कम भरल्यानंतर ४५ दिवसानंतर मिळणारी विमा रक्कमही १५५ दिवसानंतरही मिळाली नाही यावरुन केंद्र सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्यात अपयशी ठरले असून त्यांनी लवकरात लवकर विमा हफ्ता भरावा व विमा कंपनीने तात्काळ विमा रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी जिल्हा आंबा- काजू बागायतदार संघाचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, उपाध्यक्षा दिव्या वायंगणकर, सचिव अॅड. प्रकाश बोवलेकर, कोषाध्यक्ष वीरेंद्र कामत आडारकर, संचालक शिवराम आरोलकर, किशोर नरसुले, विलास ठाकुर, रतन धुरी, अनिल मांजरेकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!