कुडाळकोकणमहाराष्ट्र

कुडाळ येथील बैल विक्री बाजार पूर्ववत सुरू करावा!

कुडाळ येथील बैल विक्री बाजार पूर्ववत सुरू करावा!

कुडाळ

‘बैल विक्री व्यवसायावर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह आहे. कुडाळ शहरात ग्रामपंचायत कार्यकाळात बैल विक्री बाजार भरायचा. तो बंद झाल्याने या व्यावसायिकांचे आर्थिक व्यवहार बंद झाले आहेत. त्यामुळे कुडाळचा बैल विक्री बाजार पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी पशुधन विकास शेतकरी संघाच्यावतीने कुडाळ नगरपंचायत
मुख्याधिकारी अरविंद नातू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा कृषी पशुधन विकास शेतकरी संघाचे बबलू भोगटे, हाजीम मुजावर, अवी शिरसाट, शाहिद शेख, अभिषेक वाटवे, संदीप मयेकर, पिवो खतिफ व अन्य या संघाचे सदस्य तसेच शेतकरी उपस्थित होते.
आमचा उदरनिर्वाह हा शेती व
तत्सम व्यवसायावर अवलंबून आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी गाई, म्हशी, बैल आदींचे पालन करून आपला उदरनिर्वाह करीत असतात. कुडाळ शहरात ग्रामपंचायत कार्यकाळात बैल बाजार सुरू होता. आठवडा बाजारादिवशी हा बाजार भरायचा. बैल, म्हैस, गाय खरेदी- विक्रीचे व्यवहार यात व्हायचे. जिल्ह्यातील शेतकरी या बाजाराला
यायचे. परंतु हा बैल विक्री बाजार
गेली काही वर्षे कोरोना काळात बंद
झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बैल
विक्री करणे अत्यंत कठीण झाले
आहे. कुडाळ शहरातील आपल्या
अखत्यारित येणारा बैल विक्री बाजार
पूर्ववत करून शेतकऱ्यांना सहकार्य
करावे. त्यासाठी न. पं. चा बैल विक्री
कर भरण्यासाठी आम्ही तयार
आहोत, असे निवेदनात म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!