कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडी

माझे भाषण शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना का झोंबले -सुप्रिया सुळे

*🟥माझे भाषण शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना का झोंबले -सुप्रिया सुळे*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.२७:* मी मंत्री दीपक केसरकर यांच नाव घेऊन भाषणात टीका केलीच नाही त्यांना असं का वाटलं की मी त्यांच्यावर टीका केली त्यामुळे त्यांनी शरद पवार यांच्याकडे ते भाषण त्यांनी घेऊन जावं त्या भाषणात दीपक केसरकर यांच द जरी शब्द मी घेतला तर मी माझं भाषण रिव्हर्स घेईल असा पलटवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज येथे केला. दरम्यान पक्षात फुट पडल्यानंतर आगामी निवडणुकीत पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार का ? झाल्यास दोन ‘राष्ट्रवादी’ आमने-सामने येणार का असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांना केला असता त्या म्हणाल्या, पवार लढणार का माहिती नाही. पण, सुळे लढणार ! पवार काय करणार याची कल्पना नाही. कुठले पवार लढणार असतील अशी बातमी माझा कानावर नाही. पण, सुळे लढणार एवढ निश्चित अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत आमदारकीसाठी स्पर्धा असुन अर्चना घारेंचा नावाची कार्यकर्त्यांकडून मागणी होत असताना तिकिट दिल जाणार ? की शेवटच्या क्षणी दुसऱ्या पक्षाचा उमेदवार असणार असं विचारलं असता. कार्यकर्त्यांचा भावना असतात. आम्ही संघटना म्हणून काम करत आहोत. आमचे सहकारी आहेत त्यांच्या भावना ऐकून घ्यावा लागतात. हा तो पक्ष नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. इथे लोकांचा मानसन्मान होतो. इथे लोकशाही आहे. दडपशाही तिथे आहे, इथे नाही असं मत त्यांनी व्यक्त केल. तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही काम करतो. खोक्यासाठी आम्ही राजकारणात नाही. सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात चांगला बदल घडविण्यासाठी आम्ही राजकारणात आहोत. आम्हाला तो बदल करायचा आहे. सावंतवाडीच्या जनतेचे मनपूर्वक आभार मानते. दोन वेळा त्यांनी राष्ट्रवादीचा आमदार निवडून दिला. नंतर काय झाल याची उणीधुणी काढायची नाही आहेत असंही त्या म्हणाल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, निरीक्षक शेखर माने, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अँड. दिलीप नार्वेकर, विकास सावंत, राष्ट्रवादी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, अँड. सायली दुभाषी आदी उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!