कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीय

मनसेची नवीन जिल्हा कार्यकारिणी निश्चित

मनसेची नवीन जिल्हा कार्यकारिणी निश्चित

कणकवली

गतवर्षी बरखास्त करण्यात आलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सिंधुदुर्ग जिल्हा नवीन कार्यकारिणी तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार कार्यकारिणी तयार होत काही नावेही पुढे आली. मात्र, त्याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. दरम्यान, पुढील चार दिवसांत राज्यस्तरावरून पदाधिकारी जिल्ह्यात येऊन बैठक घेत कार्यकारिणी जाहीर करतील, असे सांगितले जात आहे. गतवर्षी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, अमित ठाकरे यांच्या जिल्हा दौऱ्याच्यावेळी मनसेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती.त्यानंतर नवीन कार्यकारणी महिनाभरात जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, वर्ष होत आले, तरीही अद्याप नवीन कार्यकारिणी जाहीर झालेली नाही. मात्र, करण्याच्या कार्यकारिणी जाहीर अनुषंगाने पदाधिकाऱ्यांच्या काही बैठका झाल्या. या बैठकांनंतर बुधवारी मुंबईत कार्यकारिणीच्या काही पदाधिकाऱ्यांची नावेही निश्चित झाल्याचे सांगण्यात आले. त्याबाबत चर्चाही झाल्या. मात्र, त्या नावांची अधिकृत घोषणा झालेली नाही. यात काही पदाधिकाऱ्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याचे समजत असले, तरीही कार्यकारिणीत जुने चेहरे असणार की नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!