विभागीय मैदानी स्पर्धेसाठी वेंगुर्ले हायस्कूलच्या ११ खेळाडूंची निवड
विभागीय मैदानी स्पर्धेसाठी बेंगुर्ले हायस्कूलच्या ११ खेळाडूंची निवड
वेंगुर्ले
१६ ते १८ ऑक्टोबर कालावधीत ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत वेंगुर्ला हायस्कूलच्या खेळाडूंनी उज्वल यश संपादन केले. यातून सांगली येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या ११ खेळाडूंची निवड झाली आहे.
१४ वर्षाखालील वयोगट : लांब उडी द्वितीय- हर्ष उदय म्हादळकर, ६०० मी धावणे- द्वितीय- जायदा अब्दुलशमी शेख, ४०० मी. धावणे : तृतीय- विधी विनोद परब, ८० मी. हर्डल तृतीय- राज राममिलन प्रजापती. १७ वर्षांखालील वयोगट मुलीमध्ये- १०० मी. व २०० मी. धावणे : प्रथम- आर्या संदीप पाटील, ३ कि.मी. चालणे- प्रथम- दिव्यंका नामदेव लटम, ३ कि.मी. चालणे द्वितीय- मनीषा सरोज यादव, ३००० मी. धावणे : द्वितीय- नेहा उमेश येरम, १०० मी. हर्डल- तृतीय- प्रांजळ गुरुदास हुले, भालाफेक व हातोडा फेक : तृतीय- खुशी आनंद गावडे. १७ वर्षांखालील वयोगट मुले- मध्ये हातोडा- फेक : प्रथम- युवराज विजय मस्के, ३००० मी. धावणे द्वितीय- रोशन विजय खानोलकर, ५ कि. मी. चालणे द्वितीय : क्रमांक- सिद्धांत सुयोग ठाकर, २०० मीटर धावणे : द्वितीय क्रमांक- हिमेश हर्बल पालव, ४ x १०० मी. रिले मुली तृतीय क्रमांक असे यश वेंगुर्ला हायस्कूलच्या खेळाडूंनी मिळविले आहे. या स्पर्धेतील प्रथम व द्वितीय क्रमांकप्राप्त खेळाडूंची सांगली येथे होणाऱ्या विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी खेळाडूंना शाळेचे क्रीडाशिक्षक श्री. व्ही. जी. वाले व श्री. आर. डी. केर्लेकर यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक श्री. पी. डी. कांबळे यांचे प्रोत्साहन लाभले.
