कणकवलीकोकणक्राइममहाराष्ट्र

कणकवलीत एक किलो एकशे दहा ग्रॅम गांजा पकडला दोघे ताब्यात

कणकवलीत एक किलो एकशे दहा ग्रॅम गांजा पकडला दोघे ताब्यात

सिंधुदुर्गात गांजाची शेती केली जाते काय?पोलिसां समोर आव्हान

कणकवली, दि २७ : शहरात ३८ हजार ८०० रुपये किंमतीचा १
किलो ११० ग्रॅम गांजा सिंधुदुर्ग एलसीबीच्या पथकाने काल रात्री साडेअकरा वाजता पकडला. हॉटेल अप्पर डेक समोर सर्व्हिस रोडवर एलसीबीने ही कारवाई केली. या गुन्ह्यात निलेश ज्ञानदेव साम (वय ४४, रा. जानवली गावठणवाडी), आणि चेतन रामू जाधव (वय २० वर्षे, रा.कलमठ कुंभारवाडी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ५० हजार रुपये किंमतीची मोटरसायकल रोख, १८० रुपये आणि ५ हजार रुपयांचा मोबाईल पोलिसांनी आरोपींकडून जप्त केला आहे. ही कारवाई एसपी अग्रवाल यांच्या आदेशानुसार एलसीबी पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मिलिंद घाग, पीएसआय आर बी शेळके, हवालदार राजू जामसंडेकर, प्रमोद काळसेकर, अनुप खंडे, बसत्याव डिसोझा, आशिष जामदार, प्रकाश कदम, किरण देसाई, पोलीस नाईक अमित तेली, पालकर, जयेश सरमळकर यांच्या पथकाने केली. फिर्याद हवालदार प्रमोद काळसेकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास पीएसआय शरद देठे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!