दोडामार्ग मराठा संघाची उद्या कार रॅली
*🟥दोडामार्ग मराठा संघाची उद्या कार रॅली*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 दोडामार्ग, दि.२७:* मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग यांचा जाहीर पाठिंबा असून त्यानिमित्ताने जनजागृती करण्यासाठी २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता साटेली-भेडशी येथे अॅड. सुहास सावंत व आरक्षण अभ्यासक राजेंद्र निकम यांचे मार्गदर्शन, त्यानंतर भव्य कार रॅली काढण्यात येणार आहे. त्यामुळे समस्त मराठा बांधवांनी या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघ दोडामार्ग तालुका अध्यक्ष अॅड. सोनू गवस व सचिव उदय पास्ते यांनी केले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण केले होते. या उपोषणाची सरकारने दखल घेतली व ४० दिवसांत आरक्षणाबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन
मनोज जरांगे-पाटील यांना दिले होते. मात्र, या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने जरांगे-पाटील यांनी पुन्हा बुधवारपासून आंदोलन करण्यास सुरुवात केली. या आंदोलनाला अखिल भारतीय मराठा महासंघाने पाठिंबा दर्शविला आहे. तसेच जनजागृती करण्यासाठी साटेली- भेडशी येथून २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता एका सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेस आरक्षण अभ्यासक राजेंद्र निकम व अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर भव्य कार रॅलीला सुरुवात करून दोडामार्ग, बांदा, शिरोडा ते मठ वेंगुर्ला अशी नेत पहिल्या दिवसाची समाप्ती होणार आहेत. या सभेला व रॅलीला तमाम मराठा बांधवांनी आपल्या कार गाडीसह उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघ तालुकाध्यक्ष अॅड. गवस व सचिव पास्ते यांनी केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

