मालवण येथे उद्या कबड्डी अजिंक्यपद निवड
*🟥मालवण येथे उद्या कबड्डी अजिंक्यपद निवड*
*🟥सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनतर्फे किशोर / किशोरी गटासाठी आयोजन*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 मालवण, दि.२७:* ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे रुजारिओ पिंटो यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या सभेत किशोर / किशोरी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या स्थळात बदल करण्यात आला आहे. हा किशोर / किशोरी गट जिल्हा अजिंक्यपद निवड / चाचणी स्पर्धा मालवण येथे २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता भंडारी हायस्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. कुमार / कुमारी गटाची निवड चाचणी स्पर्धा पुढे ढकलण्यात आली असून तिची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. किशोर / किशोरी गट (१६ वर्षांखालील, जन्मतारीख १ जानेवारी २००८, वजन ५५ किलो.) किशोर / किशोरी जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी वयाच्या दाखल्याबाबत पुरावा म्हणून शाळेचा यू-डायस नंबर व स्टुडंट आयडी असलेल्या बोनाफाईड व निर्गम उतारा यावर खेळाडूंच्या फोटोवर मुख्याध्यापकाने अर्धसाक्षांकित केलेले बोनाफाईड व निर्गम उतारा सोबत ठेवावा किंवा संबंधित खेळाडूचे वय एक वर्षापर्यंत असतानासंबंधित शासकीय विभागाने वितरित केलेला जन्म दाखला, संबंधित खेळाडूचे वय पाच वर्षांपर्यंत असताना संबंधित शासकीय विभागाने वितरित केलेला जन्म दाखला, संबंधित खेळाडूंच्या वयाची पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर संबंधित शासकीय विभागाचा जन्म दाखला असेल, तर खेळाडूच्या पहिल्या इयत्तेतील प्रवेश घेतलेल्या जनरल रजिस्टरची सत्यप्रत अनिवार्य राहील. आरटीई २००९ प्रमाणे प्रवेश घेतला असल्यास प्रथम प्रवेश घेतलेल्या शाळेचा यू-डायस व स्टुडंट आयडी असलेला निर्गम उतारा किंवा टीसीची छायांकित प्रत यावरील पैकी एका जन्मपुराव्या सोबत एक कागदपत्र असणे अनिवार्य आहे. आधारकार्डची रंगीत छायांकित प्रत व मूळ प्रत. (आधारकार्ड अद्ययावत केलेले असावे. यात जन्म तारखेची तारीख / महिना / साल स्पष्ट उल्लेख असावा.) पासपोर्ट रंगीत छायांकित व मूळ प्रत सोबत आणावी. या सभेत संघटनेच्या घटना दुरुस्तीबाबत विचारविनिमय झाला असून अॅड. अजित गोगटे यांच्या अध्यक्षतेखाली घटनादुरुस्ती समिती स्थापन करण्यात आली असून स्पोर्ट्स कोडचा अभ्यास करून आणि राज्य संघटनेच्यामार्गदर्शनाखाली व आदेशाप्रमाणे घटना दुरुस्तीचे प्रारूप बनविले जाणार आहे. पंचमंडळाची सभा सुद्धा २८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता येथील भंडारी हायस्कूल येथे घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या पंच सभेस जिल्ह्यातील कार्यरत पंचांनी उपस्थित राहवे तसेच नुकत्याच वैभववाडी येथे घेण्यात आलेल्या जिल्हा पंच परीक्षेसाठी बसलेल्या सर्व नवीन पंचांनी या किशोर / किशोरी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहून या स्पर्धेवर पंच म्हणून कामगिरी करावी, असे ठरविण्यात आले. रुजारिओ पिंटो याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला उपाध्यक्ष अॅड. अजित गोगटे, तुषार साळगावकर, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, कार्यवाह दिनेश चव्हाण, सहकार्यवाह नितीन हडकर, विजयकुमार साळुंखे, सदस्य नारायण कोठावळे, राष्ट्रीय पंच प्रितम वालावलकर, सुदिन पेडणेकर, प्रशांत वारीक, राज्यपंच शैलेश नाईक, अमित गंगावणे आदी मान्यवर उपस्थित होते. संघ निश्चिती व अधिक माहितीकरिता संपर्क सहकार्यवाह नितीन हडकर (७२४९३५७२३९), खजिनदार मार्टिन आल्मेडा यांच्याशी संपर्क साधावा.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

