वेंगुर्ल्यात २८ रोजी कोजागरी कवी संमेलन
वेंगुर्ल्यात २८ रोजी कोजागरी कवी संमेलन
वेंगुर्ले
वेंगुर्ले आनंदयात्री वाङमय मंडळातर्फे ‘चांदणझुला’ हे कोजागरी कवी संमेलन शनिवार २८ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजता साईमंगल कार्यालयाच्या सभागृहात होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते व निवृत्त प्राध्यापक सुभाष गोवेकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. कवी संमेलन अवधूत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली होईल. आनंदयात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्ल्यात साहित्यविषयक विविध उपक्रम राबवित असते. वेंगुर्ले तालुक्यातील नवोदित कवींना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने मंडळाने हे संमेलन , आयोजित केले आहे. संमेलनात शिरोडा येथील कवी स्वप्नील वेंगुर्लेकर व दाभोली येथील कवयित्री प्रीतम ओगले यांचा काव्यवाचनाचा विशेष कार्यक्रम होणार आहे.

