हळवल येथे गवारेड्यांकडून भातपिकांचे मोठे नुकसान
हळवल येथे गवारेड्यांकडून भातपिकांचे मोठे नुकसान
कणकवली
हळवल गावात गवारेड्यांनी शेतकऱ्यांना अक्षरश: हैराण केले आहे. गव्यांनी भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे गव्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
भातपीक तयार झाले आहे. या पिकाचे गवारेड्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. गव्यांकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. वनविभागाने कार्यवाही करावी, अशी त्यांची मागणी आहे.

