आपत्कालीनकणकवलीकोकणमहाराष्ट्र

विद्यार्थिनीला धडक देऊन दुचाकीस्वार पसार

विद्यार्थिनीला धडक देऊन दुचाकीस्वार पसार

कणकवली

शाळेतून घरी जात असलेल्या भक्ती सुनील नकाशे. (१२, रा. कणकवली) या विद्यामंदिर हायस्कूलच्या विद्यार्थिनीला रस्त्याने जात असलेल्या दुचाकीची धडक बसली. येथील विद्यामंदिर हायस्कूलनजीकच नवीन पोस्ट कार्यालयासमोर शनिवारी सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात मुलीच्या डोक्याला डाव्या बाजूस, डाव्या हाताच्या कोपराला दुखापती झाल्या. तसेच डाव्या पायाला मुका मारही लागला. अपघातानंतर दुचाकीस्वाराने तेथून दुचाकीसह पलायन केले. याबाबत भक्ती हिचे वडील सुनील दत्ताराम नकाशे (४२) यांच्या फिर्यादीनुसार अनोळखी दुचाकीस्वाराविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार विनोद सुपल करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!