कणकवलीकोकणक्राइममहाराष्ट्र

पोलीस असल्याची बतावणी करून लॉजमालकांची फसवणूक

पोलीस असल्याची बतावणी करून लॉजमालकांची फसवणूक

जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रकार घडल्याचे उघडकीस

कणकवली

नागपूर येथील पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून आपल्या हॉटेल, लॉजमध्ये युवतीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. असून त्यातून आरोपी म्हणून वगळण्यासाठी पैशांची मागणी करणारा ‘कॉल’ सध्या जिल्ह्यातील हॉटेल, लॉज मालकांना डोकेदुखी ठरला आहे. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकारात जिल्ह्यातील दोन हॉटेल व्यवसायिकांची आर्थिक फसवणूकही झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, या प्रकाराबाबत रविवारी दुपारपर्यंत तरी जिल्ह्यातील कुठल्याही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकपदावर काम करत असल्याचे सांगणारा तो संशयित जिल्ह्यातील हॉटेल, लॉज मालकांना कॉल करत आहे. ‘मी नागपूर पोलीस स्टेशनमधून बोलतोय. तुमच्या

हॉटेल- लॉजिंगमध्ये एक अविवाहीत जोडपे राहून गेले. त्या मुलीवर शारीरिक अत्याचार केला गेला. अत्याचाराचे शूटिंगही केले गेले. त्यानंतर अत्याचार करणाऱ्या मुलाने त्या मुलीला ब्लॅकमेल करायला सुरूवात केली. त्याची तक्रार आमच्या पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. तक्रारीत तुमचेही नाव अत्याचार करणाऱ्याचा साथीदार म्हणून आहे. तुमचे नाव या केसमधून वगळायचे असेल तर आमच्या साहेबांना तुम्हाला पैसे द्यावे लागतील’, असे पलिकडून बोलणारा सांगतो. जिल्ह्यातील दोन व्यावसायिक या भूलथापांना फसले आहेत. जिल्ह्यातील अनेक व्यावसायिकांना एकाच नंबरवरून कॉल गेला आहे, यात कणकवलीतीलही काही हॉटेल, लॉज व्यावसायिकांचा समावेश आहे. या प्रकाराबाबत गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील हॉटेल, लॉज व्यावसायिकांमध्येही चर्चा सुरू झाली आहे. ब्लॅकमेल करणाऱ्या संशयिताचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!