आपत्कालीनकणकवलीकोकणमहाराष्ट्र

हळवलच्या बेपत्ता युवकाचा मृतदेह खारेपाटणला रेल्वे रुळानजीक

हळवलच्या बेपत्ता युवकाचा मृतदेह खारेपाटणला रेल्वे रुळानजीक

कणकवली

बुधवारी रात्री ११.३० वाजल्यापासून राहत्या घरातून बेपत्ता असलेला हळवळ माता रमाई आंबेडकर नगर येथील सुशांत प्रकाश कदम (३२)हा रविवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास खारेपाटण रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर रेल्वे ट्रॅकनजीकच्या झुडपात मृतावस्थेत आढळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होती रेल्वेची धडक बसल्याने तो मृत झाल्याचे पोलिसांनी सांगितले सुशांत यांचे भांडण झाले व तो रागाने बॅगेत कपडे भरून घरातून बाहेर पडला होता. याबाबत त्याच्या चुलत भावाने शनिवारी पोलीस ठाण्यात बेपत्ताची खबर दिली होती.
रविवारी पहाटे खारेपाटण रेल्वे स्थानकानजीक ट्रॅकवर गस्त घालणाऱ्या ट्रेकमनला ट्रॅकनजीकच्या झुडपातमधून दुर्गंधी येऊ लागले पाहणी केली असता आत मध्ये मृतदेह आढळला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!