आरोग्यकोकणमहाराष्ट्रमालवण

नौकांवरील खलाशांना होतेय अतिसाराची लागण

नौकांवरील खलाशांना होतेय अतिसाराची लागण

देवगड, मालवण, ओरोस रुग्णालयात उपचार

मालवण

जिल्ह्यातील मालवण आणि देवगड बंदरामध्ये मासेमारी नौकांवर काम करणाऱ्या काही खलाशांना गेल्या काही दिवसांपासून अतिसाराची लागण झाल्याचे आढळून आले आहे. रविवारी सायंकाळी मालवणातील एका खासगी रुग्णालयात परराज्यातील तीन खलाशांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यापैकी एका खलाशाची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला तातडीने ओरोसला हलविण्यात आले.

गेल्या दहा दिवसांपासून मालवण, देवगडमधील काही खलाशांना अतिसाराची लागण झाल्याच्या वृत्तास वैद्यकीय सूत्रांकडून दुजोरा देण्यात

आला आहे. अतिसारामागची नेमकी कारणे अधिकृतरित्या समोर आली नसली तरी अन्नातून बाधा झाल्याने अतिसाराचे प्रमाण समजते. वाढल्याचे त्यातच वाढलेल्या उष्णतेचाही खलाशांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचे समजते. दरम्यान, अतिसारामुळे जिल्ह्यात एका खलाशाचा मृत्यू झाल्याचे मच्छीमारांनी सांगितले. या घटनांच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांनी खलाशांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक बनले आहे. बेकायदेशीररित्या विक्री होणाऱ्या भेसळयुक्त दारूमुळेही खलाशांचे आरोग्य धोक्यात आल्याची चर्चा किनारपट्टीवर सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!