शेतकऱ्यांनी फळपिकांचा विमा उतरवावा!
*🟥शेतकऱ्यांनी फळपिकांचा विमा उतरवावा!*
*🟥मालवण तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांचे आवाहन*
*🟥कृषी विभागामार्फत हवामानावर आधारित फळपीक योजना*
*🟥आंबा पिकासाठी प्रतिहेक्टरी ७ हजार तर काजूसाठी ५ हजार हप्ता*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 मसुरे, दि.२१:* हवामान आधारित फळपीक विमा योजना अंबिया बहार २०२३- – २४ मध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत राज्यांमध्ये राबविण्यात येत आहे. आंबिया बहारमध्ये विविध हवामान धोक्यामुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, याकरिता कृषी विभागामार्फत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. याकरिता सहभागाकरिता विमा शेतकरी सहभागाकरिता पोर्टल सुरू झाले असून कमी किंवा जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत सहभागी होऊन फळबागांचे संरक्षण करावे, असे आवाहन मालवण तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी केले आहे. कोकण
विभागात अधिसूचितकेलेल्या महसूल मंडळात आंबा, काजू व केळी पिकांच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण देण्यात येईल (आंबा व काजू ५ वर्षे) कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छीक असेल. खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कुळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांनाही ही योजना लागू राहील.
एका शेतकऱ्यास अधिसूचित फळ
पिकासाठी ४ हेक्टर क्षेत्रावर विमा नोंदणी करता येईल. विमा अर्जासोबत फळबागेचा जीओ टॅगिंग (Geo Tagging) असलेला फोटो विमा पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य राहील. एका फळपिकासाठी एका वर्षात एका क्षेत्रावर मृग व आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच बहाराकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. ही योजना सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमार्फत राबविण्यात येत आहे.
*अशी आहे अंतिम मुदत*
फळपीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत केळी पिकाकरिता ३१ ऑक्टोबर आंबा व काजू पिकाकरिता ३० नोव्हेंबर अशी आहे. आंबा पिकाकरिता प्रतीहेक्टरी विमा हप्ता ७ हजार रुपये व काजू पिकाकरिता प्रती हेक्टरी ५ हजार रुपये याप्रमाणे आहे. शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

