कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🟥 बामणोली येथील भक्तांच्या हाकेला धावणारी श्री चंडकाई – वाघजाई देवी..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण, दि-२०:- नवरात्र उत्सव म्हणजे आदी मायेचा जागर….तिच्या अनेक रूपातील व शक्ती पिठांमधील जागृतीचा उत्सव. भक्तांच्या रक्षणार्थ सदैव पाठीशी असणारी आदिमायेची अनेक रूपे कोकणात पाहवयास मिळतात. त्यापैकीच नवरात्रीमध्ये देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होणारे ठिकाण म्हणजे चिपळूण तालुक्यातील बामणोली येथील नवसाला पावणारी श्री चंडकाई वाघजाई देवी. हे देवस्थान प्रसिद्ध असून नवरात्र उत्सवात या ठिकाणी भाविक आवर्जून भेट देऊन देवीला साकडे घालतात. नवसाला पावणाऱ्या या आदी मायेच्या महिमा विषयी थोडक्यात…

 

गिरीछाया डोंगराच्या पायथ्याशी आणि दाभोळ खाडीच्या किनाऱ्यापासून अवघ्या पाच किमी अंतरावर निसर्गरम्य बामणोली हे गाव असलेले आहे. या गावाला निसर्ग सौंदर्याची दैवी देणगी जणू लाभलेली आहे. गावच्या पश्चिमेकडून खळखळ नाद करीत वाहणाऱ्या नद्या, पूर्वेकडील छोट्या डोंगरी टेकड्या, गिरिछाया डोंगर आणि मध्येच सपाटी भाग. पावसाळ्यात दिसणारी हिरवीगार शेती यामुळे निसर्गाने उदार अंतकरणाने या गावाला सौंदर्य बहाल केल्याची खात्री पटल्याशिवाय राहत नाही.

याच गावात गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले श्री चंडकाई वाघजाई देवीचे डौलदार मंदिर इतिहासाची साक्ष देत आहे. भक्तांच्या हाकेला पावणारी आणि माहेरवाशीनी व सासरवासिनी यांची पाठराखन करणारी दुर्गामाता अशीच या ग्रामदेवतेची ओळख आहे.

 

श्री चंडकाई – वाघजाई देवीच्या मंदिराचा इतिहास हा जागृत आहे . हे देवस्थान आभाळ वृद्धांपासून सर्वांच्या नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून सर्वच प्रसिद्ध आहे . सुख आणि दुःख या संसारातील चढउतारात ग्रामस्थ आपल्या मातेला कधीच विसरत नाहीत. तिमीरातून तेजाकडे जाण्याचा व अपयशावर मात करून उतुंग यशाचे शिखर गाठण्याची ताकद आपल्याला देवीच्या आशीर्वादानेच मिळते अशी अतूट श्रद्धा ग्रामस्थांच्या मनात आहे.

गावातील डींगणकरवाडी, पूर्व वनेवाडी, पश्चिम वणेवाडी, गवळवाडी आणि ब्राह्मणवाडी येथील ग्रामस्थांनी शंभर वर्षांपूर्वी बामणोली पिंपळ या ठिकाणी मंदिराची स्थापना केली. या मंदिरात दगडी पाषाणाच्या रेखीव व सुबक आकाराच्या मुर्त्यांची स्थापना केली . पूर्वी गावात वीज नव्हती. तेव्हा तेलाच्या वातीवर मंदिराचा गाभारा व मंडप तेजोमय होत असे. मात्र, बदलत्या काळानुसार आता मंदिर विजेच्या आकर्षक रोषणाईने प्रकाशमान झाले आहे. पूर्वीच्या ग्रामस्थांनी मंदिर उभारून डोक्याला भरजरी फेटा आणि अंगात सदरा व कब्जा घालून डफावर थाप मारली आणि देवीचे खेळी मानाने मातेच्या सेवेत रुजू झाले. परंतु 1984 मध्ये मातेच्या मंदिराचे बांधकाम करून कौलारू मंदिर बांधण्यात आले. यावेळी जुन्या मुर्त्या पाण्यात विसर्जित करण्यात आल्या व त्या जागी नवीन मूर्तींची स्थापना केली. परंतु या मुर्त्यांमध्ये दैवत्व आले नसल्याची भावना मानकरी व गावकर यांच्या मनात आली. कारण देव बोलेना अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावर काय करावे सुचत नव्हते शेवटी पाण्यात विसर्जित केलेल्या पाषाणी मुर्त्या पुन्हा ग्रामस्थांनी शोधून पाण्यातून बाहेर काढल्या. त्याची पुन्हा स्थापना केल्यानंतर चमत्कार व्हावा असेच घडले. सर्व मुर्त्यांमध्ये देवपण आल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

 

त्यानंतर २०१३ मध्ये मंदिराचा कायापालट सर्व गावकरी मंडळींनी करत एक डौलदार घुमटाचे मंदिर उभारले. आता मंदिराचा कारभार ट्रस्ट च्यामाध्यमातून पहिला जातो. त्याच्या वतीने शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य विषय उपक्रम राबवून सेवा देण्याची काम मंडळ करत आहे.

 

*नवरात्री उत्सव आनंदाची पर्वणी*

नवरात्र उत्सवात संपूर्ण देवीचे मंदिर विद्युत रोषणाईने सजवली जाते मंदिराचा संपूर्ण परिसर गावकरी श्रमदानातून स्वच्छ करता मंदिरासमोर दर दिवशी सडा रांगोळी काढली जाते. नऊ दिवस धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते . रोज संध्याकाळी मंदिरात सामूहिक महाआरती करण्यासाठी गावकरी जमा होतात. प्रत्येक वाडीतील ग्रामस्थांना सेवेचा मान दिला जातो . सर्वांच्या नियोजनातून नवरात्र उत्सवमध्ये रात्री नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. दांडिया नृत्याचा कार्यक्रम सुद्धा आवर्जून या नवरात्रच्या उत्सवामध्ये मंदिरामध्ये होत असतो.

 

ग्रामीण भागात मंदिर असतानाही भाविकांची गर्दी नऊ दिवस असते. मातेचा महिमा सर्व दूर पोचला आहे. नेहमी सर्वांच्या हाकेला धावणारी आई असल्याची भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली आहे.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!