सांगेली येथे आज जिल्हास्तर भजन स्पर्धा
सांगेली येथे आज जिल्हास्तर भजन स्पर्धा
ओटवणे
सांगेली मधलावाडा काजरमळा येथील श्री माटेश्वर मित्रमंडळाच्या नवरात्रोत्सवनिमित्त शुक्रवार २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भजन स्पर्धेसाठी जिल्ह्यातील निवडक ८ भजन संघांना निमंत्रित करण्यात आले आहे. स्पर्धेत सादर होणारी भजने पुढीप्रमाणे श्री माटेश्वर भजन मंडळ सांगेली (बुवा वैभव रेमुळकर), श्री रामकृष्ण हरी महिला भजन सेवा संघ तेंडोली (बुवा जुईली राऊळ), श्री ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ नेमळे (बुवा नीळकंठ राऊळ), श्री कलेश्वर पूर्वी देवी भजन मंडळ वेत्ये (बुवा प्रथमेश निगुडकर), श्री विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ आंदुर्ले (बुवा अथर्व होडावडेकर), श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ वर्दे (बुवा नरेंद्र मेस्त्री), श्री कलेश्वर प्रासादिक भजन मंडळ नेरूर (बुवा मिहीर मेस्त्री), श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ कलंबिस्त (बुवा लक्ष्मण राऊळ).
या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक आहे. ५००१ रुपये, द्वितीय ३००१ रूपये, तृतीय २००१ रूपये, उत्तेजनार्थ १००१ रूपये, स्पर्धेतील उकृष्ट गायक, पखवाज वादक, तबला वादक, हार्मोनियम वादक, कोरस आणि झांज वादक यांच्यासाठी प्रत्येकी ५०१ रुपयांचे पारितोषिक आणि सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे

